दोन दुचाकीच्या अपघातात तरूण ठार

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहुर ते शेंदुर्णी दरम्यान दोन दुचाकीची समोरासमोर धडकेत दुचाकीवरील तरुण ठार झाल्याचे घटना घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाना मारुती पाटील (वय-३७) रा. लोणी ता.जामनेर हा तरुण १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आपले खाजगी काम आटोपून (एमएच १९ सीएन २८०) क्रमांकाच्या दुचाकीवरून शेंदुर्णी ते पहूर दरम्यान जात होता. त्यावेळी गोंदेगावच्या पुढे चढथीवर समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ डी वाय ७८६०) याने जोरदार धडक दिली. या धडकेत नाना मारुती पाटील हा ठार झाला. दरम्यान अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार हा दुचाकी सोडून पसार झाला होता. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

 

Protected Content