धक्कदायक : गर्भवती महिलेला भरदिवसा विवस्त्र करण्याचा प्रयत्न !

पालघर (वृत्तसंस्था) वसईमध्ये राहत्या घरात एका गर्भवती महिलेला दोन अज्ञात लोकांनी भरदिवसा विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलेय की, ती पाच महिन्याची गर्भवती असून पोलीस भरतीचे क्लासेस घेते. मात्र, रविवार असल्याने क्लासला सुट्टी होती. तर, पती कामावर गेले होते. त्यामुळे त्या एकट्याच घरी होत्या. त्यावेळी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घराची बेल वाजली. दरवाजा उघडल्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी पती कुठे आहे? अशी विचारणा करत दोन जण जबरदस्तीने घरात शिरले. त्यानंतर त्यांनी पीडितेला धक्का देऊन तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करुन तिचे फोटोही काढले. घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Protected Content