पहूर येथील जि.प. शाळेत चिमुकल्यांच्या कार्यक्रमाने भारावले नागरीक

पहूर, प्रतिनिधी । येथील संतोषीमातानगर पहूरपेठ जि.प.प्राथमिक शाळेत नुकताच चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाने उपस्थित पालक व नागरीक भारावले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्गुणा महाजन ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सदस्या तथा जि.प. सदस्या प्रमिलाताई पाटील, सरपंच निताताई पाटील, माजी सरपंच तथा कृषी सभापती जि.प. जळगाव प्रदीप लोढा, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, उपसरपंच शाम सावळे, उत्तर महाराष्ट्र धनगर समाजाचे प्रमुख रामेश्वर पाटील, केंद्रप्रमुख भानुदास तायडे, मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्याहस्ते भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व द्विप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, बालगीते, धार्मिक गीते, गाणी, कोळी गीत, शेतकरी गीत तसेच रेकॉर्ड डान्स आदी कलारंजानाचे कार्यक्रम बघुन उपस्थित पालक, नागरिक व प्रमुख अतिथी मान्यवर भारावून गेले व बक्षिसे देवून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी केले व सुत्रसंचलन उपशिक्षक दिनेश गाडे, श्रीमती रोहिणी शिंदे यांनी केले व आभार मानले. कार्यक्रमास पहूर पोलीस स्टेशनचे सपोनि राकेश परदेशी, पंडीत सोनार, जेष्ठ पत्रकार शांताराम लाठे, मनोज जोशी, शंकर भामेरे, डॉ. जितेंद्र वानखेडे, माजी केंद्रप्रमुख हरी धंजे, प्रल्हाद वानखेडे, सुभाष कुमावत, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रविण लहासे, सदस्य बन्सी तायडे, राजेंद्र धुळसंधीर, विकास लहासे, स्वाती आस्कर, अनिता कुमावत, बाळु दांडगे, मनिषा कुमावत, अमोल नलावडे, विकास पाटील, निलेश भामरे, सुनील कोळी, दत्तात्रय माळी, विजय राजपुत, महेश मोरे, श्रीकांत पाटील, अनिल गायकवाड, मधुकर लहासे, पहूर, वाकोद, पाळधी, शेंदुर्णी, नाचणखेडा, जामनेर केंद्रातील शिक्षक पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक चित्रलेखा राजपूत, सुवर्णा मोरे, दिनेश गाडे, रत्नमाला काथार, रोहिणी शिंदे, मनिषा राऊत तसेच विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content