दोंदवाडा येथील कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू; संपर्कातील १४ जण क्वारंटाईन

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या सात किलोमीटर असलेल्या दोंदवाडा ता. जामनेर येथील संशयित रूग्णाचा १९ मे रोजी जिल्हा कोवीड रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना रिपोर्ट अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संपर्कातील १४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

शेंदूर्णी येथून जवळच सात किलोमीटर असणाऱ्या दोंदवाडा तालुका जामनेर येथिल वृद्धाचा १९ मे २०२० रोजी जळगाव येथिल कोविड १९ रुग्णालयात मृत्यू झाला होता. अंतविधी जळगावात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत उरकण्यात आला होता. मृत व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. खबरदारी म्हणून मयताच्या संपर्कातील दोंदवाडा येथील ६, आणि पाळधी ता. जामनेर येथील ८ जणांचे स्वॅब ग्रामीण रूग्णालयात घेणे सुरू आहे. संपर्कातील नातेवाईकांना होम क्वारंटाईन तर जवळच्या संपर्कातील सर्वांना पहुर येथिल कोविड क्वारेंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Protected Content