सारी आजाराने मृत्‍यु , अंत्यसंस्काराला एकवटले सर्वधर्मीय

भुसावळ, प्रतिनिधी । येथील खडका रोड भागातील ३२ खोली रस्‍ता वळणावरील आशादिप बिल्‍डींग समोर दोन भाऊ राहत होते. सारीच्‍या आजाराने काल दि.२३ रोजी एकाचे निधन झाले. त्यांच्यावर परिसरातील मोजक्‍या हिंदु-मुस्‍लीम बांधवांनी अंत्‍यसंस्‍कार केले.

सारीच्या आजाराने मृत्यू झाला असता रात्रीच त्‍यांचा मृतदेह रूग्‍णालयातुन रूग्‍णवाहीकेने घरी आणल्‍यावर संबंधितांनी घराबाहेर सोडून निघून गेले. परिसरात योग्य फवारणी आणि उपाययोजना होणे आवश्यक असतांना नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले. संसर्गजन्‍य आजाराने मृत्‍यू झाल्‍याने अंत्‍यसंस्‍कार कसे करावे असा प्रश्‍न उपस्‍थित झाला होता. सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील,साजीद शेख यांनी अंत्‍यसंस्‍कारासाठी नगराध्‍यक्ष रमण भोळे व मुख्‍याधिकारी करूणा डहाळे यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांचे भ्रमणध्‍वनी बंद होते. नगरपरिषद रूग्‍णालयाच्‍या महिला वैद्‍यकिय अधिकारी डाॅॅ.किर्ती फलटणकर यांच्‍याशी संपर्क साधून कर्मचारी व शववाहिनीची मागणी केली. मात्र त्‍यांनी त्‍यास नकार दिला.पीपीई किटची मागणी त्‍यांनी मान्‍य करून २ किट उपलब्‍ध करून दिले. परिसरातील मोजक्‍या हिंदु-मुस्‍लीम बांधवांनी शेवटी मृतदेह नेत अंत्‍यसंस्‍कार केले.

Protected Content