यालाही जिवन ऐसेच नाव …. ?

 

ही बाई दररोज सकाळी लोकांच्या दारा समोर जाते कमरेला बांधलेले ढोलक गुबू गुबू वाचवत घरात आवाज देते ….. ताई काहीतरी वाढ आई भवानी तुझ्या लेकरा बाळांना सुखी ठेवेल तुझा संसार सुखाचा होईल तुला कशाची कमी पडणार नाही आये…… काही भाकरतुकडा वाढ ….. हाक दिलेल्या घरातून मिळेल ते घेतल्यावर पुन्हा समाधानाने म्हणते …. बाई तुझे लेकरं बाळ सुखी राहतील ग…. आणि पुढच्या घराकडे निघून जाते

स्वतःच्या मुलाबाळांचे पोट भरावे म्हणून दारोदार हिंडून भाकर तुकडा ही बाई मागते आणि लोकांची पोरबाळ.. सुखी राहावीत म्हणून तोंड भरून आशीर्वाद देते डोक्यावर आदिशक्ती जगदंबेची मूर्ती घेऊन फिरते….. पण तिच्या ह्या दारिद्र्यबद्दल तिची या जगदंबेकडेदेखील काही तक्रार नाही तिचा भार डोक्यावर घेऊन ती आपल्या उदरभरणासाठी रोज दारोदार हिंडते …… आहे त्या परिस्थिती बरोबर लढण्याचं धैर्य ठेवते ….. समाजाने दिलेले शिळ पाक..अन्न आपल्या मुलाबाळांना खाऊ घालते आणि त्यांना सुखाचा आशीर्वाद देते
यालाही जीवन ऐसेच नाव …….. ?
दिलीप घोरपडे । ( चाळीसगाव )

Protected Content