वेताळवाडी किल्ल्यावरील दुर्लक्षित ‘तोफ’ला मिळणार गतवैभव

chalisgaon tof

चाळीसगाव प्रतिनिधी । महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ल्यावर आजही पराक्रमी मावळ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा पावलोपावली पाहायला मिळतात. याचाच एक भाग म्हणून सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी किल्ल्यावर एक भव्यदिव्य अशी तोफ आजही एका कोपऱ्यात पडलेली पाहावयास मिळते गेल्या अनेक वर्षापासून ही तोफ, ऊन, वारा, पाऊस खात संवर्धनाच्या प्रतीक्षेत पडून होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सह्याद्री प्रतिष्ठानच्या कन्नड विभागामार्फत या तोफेला तोफ गाडा बसवून तिला पुन्हा एकदा तिच्या मूळ जागेवर वैभवाने बसून लोकार्पण करण्याचे नियोजन केले, असून यासाठी लोकवर्गणीतून या तोफेसाठी युरोपीय पद्धतीचा सागवानी लाकडाचा बनवलेला चार चाकी तोफ गाडा येत्या 28 एप्रिल रोजी वेताळवाडी किल्ल्यावर लोकार्पण केला जाईल.

या सोहळ्यासाठी जैन उद्योग समूहाचे अशोक भाऊ जैन, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, चाळीसगावचे उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे विविध विभागातील पदाधिकारी शिलेदार या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहणार असून गड किल्ले संवर्धन प्रेमींनी व शिवप्रेमींनी या सुंदर अशा कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान कन्नड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content