पोलीसांकडून व्यापाऱ्याला मारहाण; पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

raver 1

जळगाव प्रतिनिधी । पैशांच्या वादातून रावेर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांनी मारहाण केल्याचा आरोप धान्य व्यापारी अमजद खान अफजल खान रा. रावेर यांनी केला आहे. मारहाणीत जखमी झाल्याने नातेवाईकांनी खान यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासही टाळाटाळ होत असल्याने खान यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षकांकडे अर्जाव्दारे तक्रार केली आहे.

अमजदखान यांची मोरगाव येथील भिला पाटील, कर्जोद येथील शेख हनिफ शेख वाहेद यांच्यासोबत भागीदारी आहे. 25 रोजी रावेर पोलीस ठाण्यातून खान यांना भिका पाटील यांचा फोन आला. त्यानुसर खान त्यांचा चुलतभाऊ व मित्रासोबत गेले. याठिकाणी रसलपुर येथील सुरेश धनके याने काही तक्रार केली होती. धनके यांचे जे पैसे घेतले असतील ते देवून टाका म्हणून पोलीस निरिक्षकांनी पाटील व वाहेद यांच्यासह खान यांना सांगितले. तिघांनी पैसे नंतर देवू असे सांगितल्यावर संतापात पोलीस निरिक्षकांनी तिघा व्यापार्‍यांना ठोकून काढा अशा कर्मचार्‍यांना सुचना दिल्या. त्यानुसर कर्मचार्‍यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बंद करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यात खान बेशुध्द झाल्यावर कर्मचार्‍यांनी त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यादरम्यान 30 हजार रुपये काढून घेतल्याचेही खान यांनी तक्रारीत नमूद केले आहे. बेकायदा, शिवीगाळ, धमक्या व मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करणयात यावी, माझे फिर्याद जाब जबाब नोंदविण्यात याव, रितसर चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर खान यांची स्वाक्षरी असून याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे शुक्रवारी अर्जाव्दारे तक्रार केली आहे.

Add Comment

Protected Content