लोकवर्गणीतून मुंगसे येथील जिल्हा परिषद शाळा झाली डिजिटल

mungase shala

अमळनेर प्रतिनिधी । सध्या इंग्रजी मेडीयम शाळेतील विद्यार्थ्यांचा कल मराठी शाळांकडे वाढतांना दिसत आहे. कारण मराठी शाळामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम, दर्जेदार शिक्षण, विद्यार्थी केद्रीत अध्यापन, संगणक शिक्षण, यामुळे सध्या इंग्रजी शाळेतील कल कमी होऊन मराठी शाळाकडे कल वाढलेला आहे.अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील जिल्हा परिषदेची शाळा येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी लोकवर्गणीतून डिजीटल शाळा केली आहे.

अमळनेर तालुक्यातील जि.प.शाळा मुंगसे येथील मुख्याध्यापक अशोक इसे, शिक्षक जगदीश चौधरी, यांनी शाळा लोकवर्गणीतून डिजिटल लोकसहभागातून शाळेचा कायापालट भरगोस निधी जमा करून संस्काराबरोबर दर्जेदार शिक्षण देऊन परीसरात नावलौकीकला पात्र ठरली. येथील कर्मचारी वर्गाने १०० टक्के उपस्थिती, १००टक्के गणवेश, १०० टक्के गुणवत्ता वाढीस लागली. लोकसहभागातून संगणक संच, एल.ई.डी टिव्ही संच, प्रत्येक मुलांना दप्तर, शैक्षणिक साहित्य, अवांतर वाचनाची पुस्तके. प्रत्येक वर्गात आरसा, घडयाळ, पंखे, ग्रामपंचायतकडून थकीत विजबिलाचा भरणा करण्यात आला आहे. लोकसहभागातून रंग व मंजुरीचा खर्च हे सर्व करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शिक्षणाविस्ताराधिकारी पी.डी.धनगर, केद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांचे योगदान लाभत आहे.

Add Comment

Protected Content