‘प्रतिभा संगम’ कार्यक्रमात सागर कोळी द्वितीय क्रमांकाने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी । दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ, आणि राष्ट्रीय कला मंच जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन ‘प्रतिभा संगम’ 2022 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सागर कोळी या युवा कवीला द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले आहे.

या कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील सागर सुकदेव कोळी व कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय , मारवड तृतीय वर्ष कला चा विद्यार्थी मराठी कविता या कला प्रकारामध्ये त्यांनी स्वलिखित कविता सादर केली.

परिक्षक तसेच सुप्रसिद्ध कवी अशोक कोतवाल, महाराष्ट्र राज्य कलामचं सहसंयोजक प्रसाद जाधव, कार्यक्रम प्रमुख भूमिका कानडे व मान्यवरांचे हस्ते सागर कोळी या युवा कवीला द्वितीय क्रमांक देऊन गौरवण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याच्या यशाबद्दल मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संस्थेचे अध्यक्ष तसेच संचालक मंडळासह पत्रकार ईश्वर महाजन तसेच परिसर व मित्रपरिवार कडून अभिनंदन होत आहे.

 

 

 

Protected Content