नांद्रा येथे स्वातंत्र्य सैनिक सुपुत्रांचा जाहीर सन्मान

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील  नांद्रा येथे स्वातंत्र्यस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.  ६  ते १५ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र उत्सव साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनी क्रिएटिव्ह स्कूलमध्ये स्वातंत्र्य सैनिक  सुपुत्रांना सन्मानित करण्यात आले.

 

स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी माजी सैनिक मन्साराम सूर्यवंशी यांच्या हस्ते क्रिएटिव्ह स्कूलमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सन – १९४२ च्या चलेजाव चळवळीत नांद्रा येथील तीन थोर स्वातंत्र्य सेनानी स्व.  लोटन सोनजी सूर्यवंशी,  स्व. माधवराव लाला सूर्यवंशी, स्व. कपूरचंद नथमल मुथा यांनी सक्रिय सहभाग घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. त्यामुळे गावाचा सन्मान वाढला व त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा क्रिएटिव्ह स्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. यात त्यांचे सुपुत्र अनुक्रमे विश्वनाथ लोटन सूर्यवंशी, पंडित माधवराव पाटील, लखीचंद कपूरचंद मुथा यांना  क्रिएटिव्ह स्कूलतर्फे प्रा. यशवंत पवार व ओम पवार यांनी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.  याप्रसंगी  विनोद तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, विनोद बाविस्कर, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर, पिंटू बोरसे, स्वप्नील बाविस्कर, संदीप पाटील, भागवत गोसावी, बंटी सोनावणे, ओम पवार, हिरालाल सूर्यवंशी, नामदेव पाटील, विजू पाटील, नवल पाटील, सुधाकर पाटील उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले.   त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.  यशस्वीतेसाठी नम्रता पवार, अरुंधती राजेंद्र, वैशाली पाटील, जयश्री पाटील, श्वेता पाटील, पूजा काळे, श्वेता बोरसे, पूजा धोबी, सुभाष पिंपळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका जयश्री पाटील व श्वेता पाटील तर प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले.

 

Protected Content