एम.जे.कॉलेजातील विद्यार्थ्याने अचानक फोडले स्वत:चे डोके

Police boyes news

जळगाव प्रतिनिधी । मु.जे.महाविद्यालयातील विद्यार्थ्याने स्वत:चे डोके फोडून घेतल्याने त्याला ततडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र अचानक तब्बेत बघडून ग्लानीने चक्कर येवून पडला असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

store advt

याबाबत माहिती अशी की, उमेश उर्फ मयूर संजय जाधव (वय-26) रा. पोलीस कॉलनी, जळगाव हा पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून मु.जे. महाविद्यालयात एम.एस्सी.चे शिक्षण घेत आहे. आज दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास पार्किंगमध्ये उभा असतांना त्यांने स्वत:चे डोके भिंतीला आपटून फोडले असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. मात्र याबाबत अचानक तब्बेत बघडून ग्लानीने चक्कर येवून पडला असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. त्याला उपचारार्थ जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!