जळगाव, प्रतिनिधी | स्वानंद सुखनिवासी सदगुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव तथा वै.गुरुवर्य मोठेबाबा, वै. गुरुवर्य झेंडूजी महाराज, वै. गुरुवर्य नथ्थूसिंग बाबा, वै. गुरुवर्य जगन्नाथजी महाराज अंजाळेकर यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून दोन दिवशीय ‘ पसायदान’ चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हभप अंकुश महाराज मानवेलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज आदी उपस्थित होते.
जगविख्यात संतपरंपरा ही आपल्या महाराष्ट्राला लाभलेली असून तरीही आजच्या धावत्या युगात भरकटलेल्या समाजाला ज्या तत्वज्ञानाची संतवाङ्मयीन विचारधारा कल्याणदायी ठरणार आहे. त्याच हेतूने आमदार राजूमामा भोळे यांच्या आयोजनातून श्री.विद्वतरत्न श्री. ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे, हा प्रवचन महोत्सव नवीन साईबाबा मंदिर अण्णासाहेब पाटील नगर, गुजराल पेट्रोल पंपामागे येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी भाविकांनी या प्रवचन सोहळ्याचे श्रावण करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवचन सोहळा हा शनिवार ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ ते ९ होणार असून २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत समारोप कार्यक्रम होणार आहे.