त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात ध्वजारोहण

Farmcy college

जळगाव प्रतिनिधी । त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अजित मेंडकी उपस्थित होते त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील के.के. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.एस. जैन, संस्थेचे चेअरमन पंडित अण्णा पाटील, मनोज पाटील, विश्वनाथ पाटील, विलास पाटील, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

‘जल है तो कल है’ या विषयावर आधारित प्रा. अजिंक्य जोशी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. नेत्रदीपक असा सोहळा साजरा करण्यासाठी प्रा. गोपाल पाटील व प्रा. समीर तडवी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पाटील यांनी केले तर प्रा.स्वप्निल जाधव यांनी आभार मानले.

Protected Content