बेंडाळे महिला महाविद्यालयात एकदिवसीय प्राध्यापक अभिमुखता कार्यक्रम

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आय.क्यु.ए.सी. व फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम समिती, माजी विद्यार्थी संघटना यांच्या अंतर्गत नवनियुक्त प्राध्यापकांसाठी एकदिवसीय अभिमुखता कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन चार सत्रात करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. गौरी राणे यांनी आपले अध्यक्षीय विचार मांडतांना महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार स्वायत्तेबाबत महाविद्यालयात येऊ घातलेले नवीन बदल आणि महाविद्यालयाची जबाबदारी व भूमिका तसेच संशोधनाचे महत्व या विषयी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. प्रथम सत्रात प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य (विज्ञान शाखा) प्रा.डॉ.पी.एन.तायडे यांनी संस्थेचा व महाविद्यालयाचा इतिहास’ व शैक्षणिक विकासाबाबत झालेली प्रगती व यामुळे समाजात संस्थेची यशोगाथा याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य (कला आणि वाणिज्य शाखा) प्रा. डॉ. व्ही.जे.पाटील यांनी शिक्षक-कार्यसंस्कृतीतील नैतिकता आणि नियम’ या विषयी आपले विचार मांडतांना सांगितले कि, शिक्षक कसा असावा, शिक्षकाचे विद्यार्थ्यांप्रती आणि समाजाप्रती असलेले दायित्व कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले.तिसऱ्या सत्रात डॉ. स्मिता चौधरी चेअरमन, आय.क्यू.ए.सी.यांनी आय.क्यु.ए.सी. व नॅक या संबंधी यांनी शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढविता येईल व यात आय.क्यु.ए.सी. व नॅक बद्दल विस्तृत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या चौथ्या सत्रात प्रमुख वक्ते संचालिका व पदवी व्यवस्थापनशास्त्र विभाग प्रमुख क.ब.चौ. उतर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील प्रा. डॉ. मधुलिका सोनवणे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांना मार्गदर्शन करतांना शिक्षकांमध्ये उद्योजकीय योग्यता विकसित कशी करता येईल आणि याचा लाभ विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित करून त्यांना स्वावलंबीत कसे करता येईल? तसेच व्यक्तिगत हिताची परवा न करता देशाच्या विकासासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी आपण योगदान दिले पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सविता नंदनवार आणि सूत्रसंचालन प्रा. पूजा टाक यांनी केले. तर प्रमुख वक्ते यांचा परिचय हा प्रा. शेख मोईन, प्रा.प्रियंका आठे, प्रा.मिताली अहिरे, प्रा.सविता पाटील आणि प्रा.विश्वेश्वरी नेवे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.योगिता सोनवणे, प्रा.वैशाली विसपुते, प्रा.नमिता भोळे, प्रा.ज्योत्स्ना पालेकर आणि तकदिष शेख, कमरीन शेख यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रा.ऐश्वर्या परदेशी यांनी पसायदान म्हटले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ.गौरी राणे समन्वयक प्रा.रत्ना महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Protected Content