Home धर्म-समाज भुसावळ येथे डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘वसंत पंचमी’ साजरी

भुसावळ येथे डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘वसंत पंचमी’ साजरी

0
26

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथे डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘वसंत पंचमी’ उत्साहात साजरी करण्यात आली.

‘वसंत पंचमी’ हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो.

त्यानिमित्‍त डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी उपस्थीतांनी सरस्वतीची प्रार्थना केली.


Protected Content

Play sound