संभाजीनगरमध्ये भारतीय प्रतीकांचा अपमान ; एबीव्हीपीतर्फे निषेध

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सवात नाटक सादरीकरण दरम्यान भारतीय प्रतिकांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेरच्या वतीने याविरोधात  निदर्शने करण्यात आली व तहसीलदार निवेदन देण्यात आले.

 

 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सवात नाटक सादरीकरण दरम्यान  प्रभू श्रीराम चंद्र व माता सीता यांची विटंबना करण्यात आली. या  घटनेचा निषेध म्हणून आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर च्या वतीने जामनेर शहरात  निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी  शहरमंत्री अजय सपकाळ, देवगिरी प्रदेश कार्यकारिणी सदस्य पवन बावस्कर ,  अभ्यास मंडल प्रमुख यश महाजन , सह संपर्क प्रमुख नंदनी माळी , शहर महाविद्यालय प्रमुख पुरषोतम माळी, कला मंच सहसयोंजक राहुल नाइक, प्रतिक महाजन,   तसेच अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content