मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यामुळे राऊत यांना यंदाची दिवाळी ही जेलमध्येच साजरी करावी लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली.
ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. हे प्रकरण अत्यंत कॉम्प्लिकेटेड असल्याने मलाही याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २ नोव्हेंबरला सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे राऊत यांना यंदाची दिवाळी ही जेलमध्येच साजरी करावी लागणार आहे.