मयताच्या कुटुंबाचे डॉक्टरांवर दुर्लक्षाचे आरोप ; चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

जळगाव  प्रतिनिधी   ।  प्रा आ केंद्रापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही  उपचार होण्यापर्यंत अडचणीं आल्या  उपचारासाठी डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याने  प्रदिप पावरा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या कुटुंबियांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

प्रदीप पावरा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना  २९ मार्चला चोपडा तालुक्यातील लासुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तात्काळ चोपडा येथे हलवण्यास सांगितले. याठिकाणी त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले  होते. याठिकाणी वार्ड क्रमांक १४ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असतांना ते पलंगावरून खाली पडले व खूप वेळ पडून होते व जोरात विव्हळत होते. मात्र कोणीही न आल्याने आम्ही काही वेळाने हिम्मत करून यांना कॉट वर टाकले तेव्हा पासून पेशंट पूर्ण गंभीर अवस्थेत गेल्याचा आरोप मयताच्या कुटुंबियांनी केला.

 

रुग्ण पलंगावरुन पडल्यापासून अत्यावस्थ झाल्याने रुग्ण पूर्णपणे अचेतन झाले होते. रविवारी सायंकाळी  त्याचा मृत्यू होईपर्यंत ते अचेतनच राहिले  आम्ही आदिवासी समाजाचे व  गरीब असल्याने माझ्या वडिलांवर उपचारा दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करताना प्रचंड हेळसांड  झाली  त्यांच्याकडे अक्षम्य  दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांच्या मुलासह मयताच्या कुटुंबियांनी केला आहे.

 

रुग्णालयात उपचार सुरु असतांना हिन वागणूक दिली ह्या बाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड नंबर १४ चे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे संबंधित कर्मचारी व डॉक्टर ज्यांनी उपचारादरम्यान जाणून बुजून दुर्लक्ष केले.  चौकशी करत दोषीवर तात्काळ अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. आम्ही सर्व मूल वडिलांवर अवलंबून  होतो  व  शिक्षण घेत होतो आम्हाला पोरके करणार्‍या दोषी वर चौकशी करून तात्काळ  कारवाई  करण्याची मागणी मयताच्या मुलांनी व  कुटुंबियांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Protected Content