जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेश कॉलनीतील पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबात बुधवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहिदास देवीदास गोपाळ (वय-२५) रा. सारोळा ता. मुक्ताईनगर ह.मु. रिंगरोड, जळगाव हा तरूण आपल्या मित्रांसोबत राहतो. मंगळवार १६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता रोहिदास गोपाळ हा त्याचा मित्र अरूण पाटील याच्यासोबत दुचाकी (एमएच १९ बीएक्स ७८९८) ने गणेश कॉलनीतील पेट्रोलपंपाकडून जात होते. त्याचवेळी समोरून (एमएच १८ बीक्यू ६२३४) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रोहिदास गोपाळ आणि अरूण पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुधवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी दुचाकीस्वार प्रविण सातवा गवळी रा. शंकरराव नगर, जळगाव याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहे.