सध्या काळ्या आणि पांढर्‍या दाढीचीच चलती : छगन भुजबळ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्याबाबत चर्चा करतांना जोरदार टोलेबाजी केली.

प्रत्येकच वस्तू वा सेवेवर जीएसटी लागल्याने अभूतपुर्व महागाई कडाडली असून यावरून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज आज सरकारला धारेवर धरले. अधिवेनाच्या दुसर्‍या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले. तर, छगन भूजबळ यांनी जीएसटीवरुन मुद्दा मांडत केंद्र सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, आता अगदी शालेय पुस्तके, वह्या आणि खोडरबरावरही जीएसटी लावण्यात येत असल्याने महागाईत वाढ झाली आहे. यावर सरकारने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, याप्रसंगी त्यांनी दाढींवर भाष्य केल्याने सभागृहात एकच हशा पिकला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालात याचा मला आनंद झाला. यामागचे कारण हे वेगळंच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अस झाल आहे की दाढीवाले मुख्यमंत्री झालेत. पण त्याच्यामध्येपण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव हा इकडेच आहे. पांढर्‍या दाढीचा प्रभाव संपुर्ण हिंदुस्तानावर आहे असे मिश्कील उदगार त्यांनी काढले.

Protected Content