लोक अदालतीत मोटार अपघात दाव्यातील २२ प्रकरणे निकाली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जळगाव जिल्हा वकील संघाच्यावतीने रविवारी ३० जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोटार अपघात दाव्यातील २२ प्रकरणे निकाली काढण्यात येवून दीड कोटींपेक्षा अधिक नुकसान भरवाई विमा कंपनीकडून देण्यात आली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जळगाव जिल्हा वकील संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीचे आयोजन  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.ए.के.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आला. यावेळी मोटार अपघात दाव्यातील पक्षकारांचा व वकिलांचा प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. यात मोटार अपघात दाव्यातील २२ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना दीड कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्याची मान्यता विमा कंपन्यांनी दिली.

याप्रसंगी विविध मोटर अपघात दाव्यातील प्रकरणांमध्ये अॅड. श्रेयस चौधरी, अॅड. महेंद्र  चौधरी,  अॅड. हेमंत जाधव यांनी पुढाकार घेत न्यायालयाच्या माध्यमातून वादींतर्फे एकूण २२ प्रकरणे निकाली काढण्यात आले. विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये केवळ सहा ते आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पक्षकारांना न्याय मिळाला आहे.

 

Protected Content