मु.जे. महाविद्यालयात ‘स्टार्टअप्स बियाँड कॉर्पोरेट’ या विषयावर व्याख्यान

mj college news1

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई.सोसायटी संचालित मु. जे. महाविद्यालयातील स्कुल ऑफ कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंटच्या विभागात बुधवार ११ डिसेंबर रोजी ‘स्टार्टअप्स बियाँड कॉर्पोरेट’ या विषयावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाला तक्षशीला बिझनेस स्कुल जयपूरचे डॉ.रंजन उपाध्याय प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे, स्कुल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे संचालक सी.ए.वाय.ए. सैंदाणे विद्याशाखा प्रमुख डॉ.ए.पी.सरोदे , सी.ए.एन आरसिवाला, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी. कुलकर्णी, डॉ.एस.एन.भारंबे उपस्थित होते. डॉ. रंजन उपाध्याय यांनी सांगितलॆ की, उद्योग सुरु करतांना तुम्ही सर्व बाजुंनी अभ्यास करूनच पुढे जावे तसेच .सरकारच्या स्टार्ट अप इंडिया, स्टॅंड अप इंडिया या विविध योजनेची माहिती दिली. उद्योग सुरु करतांना केवळ प्रात्यक्षिक ज्ञानच नव्हे तर सैध्दांतीय ज्ञान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यात मार्केटमध्ये स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उद्योगाविषयीचे आणि त्याच्यापर्यावरणाविषयीचे पायाभूत ज्ञान असणे महत्त्वाचे आहे .या ज्ञानाच्या आधारावरच त्यांना पुढे वाटचाल करणे सोपे होईल असेही मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला स्कुल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते, यशस्वी तेसाठी सर्व प्राध्यापक वृंदाचे विशेष सहकार्य लाभले.

Protected Content