विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवज्योत रॅलीचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या मंगळवार ६ जून रोजी सकाळी ७ वाजता शिवज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिवज्योत रॅली व इतर कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, विचारधारा प्रशाळा, श्री.छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास व संशोधन केंद्र व सामाजिकशास्त्रे प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. शिवज्योत रॅलीची सुरुवात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून सुरु होऊन प्रशासकीय भवनाजवळ संपेल. तदनंतर श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतीमेचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर महाराजांच्या जीवनावरील पोवाडा गायन प्रशासकीय इमारतीजवळ करण्यात येईल. या कार्यक्रमास रासेयो स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा.सचिन नांद्रे यांनी केले आहे.

Protected Content