
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थकांमध्ये काल दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसचारातील मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे.
सोमवारी दिवसभर घडलेल्या हिंसाचारात एका पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. त्यांनतर आता मृतांच्या संख्येत वाढ होवून हा आकडा सातवर पोहचला आहे. सीसीएचे समर्थक आणि विरोधक यांच्या उफाळलेल्या हिंसाचाराची धग आज सकाळी देखील कायम असल्याचे चित्र दिल्लीत आहे. ब्रह्मपुरी भागात दगडफेक झाली. तर अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांकडून आज देखील पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या.