रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली; गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गोदावरी कॉलनीतून एका रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिमन्यू कुमार प्रसाद (वय-३४) रा. गोदावरी कॉलनी, आर.बी.क्वाटर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते रेल्वे विभागात सहाय्यक लोको पायलट म्हणून नोकरीला आहे. २१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएल ९७९९) हे घरासमोर पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ४५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सोनवणे करीत आहे.

Protected Content