ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव कालवश !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी चित्रपटसृष्टी गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी आज सकाळी शेवटचा श्‍वास घेतला असून त्यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी ही माहिती दिली आहे.

 

ज्येष्ठ अभिनेत्री  सीमा देव (वय ८१) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्या रमेश देव यांच्या सौभाग्यवती होत्या. या दाम्पत्याने एक काळ रूपेरी पडदा गाजवला होता.

 

त्यांनी आपल्या कारकिर्दीत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले होते. त्यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. तयांचे माहेरचे नाव नलिनी सराफ असं होतं. ‘आलिया भोगासी’ या सिनेमातून त्यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांंमधून काम केलं. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुलं आहेत. गेल्या वर्षी रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर आज त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या   हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका देखील वाखाणण्यात आली होती.

Protected Content