जुन्या वादातून एकाला लोखंडी वस्तूने मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ४४ वर्षीय शेतकऱ्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने शिवीगाळ व लोखंडी गज डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तान्हाजी लहू काळे, (वय-४४) रा. हिरापूर ता. चाळीसगाव जि.जळगाव हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १८ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता तान्हाजी काळे हे घरी आपली दुचाकी घरासमोर पार्किंग लावत होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील हेमंत लहू काळे रा. हिरापूर ता. चाळीसगाव जि.जळगाव याने तान्हाजी काळे याला शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तर लोखंडी गज मारून गंभीर दुखापत केली. जखमीवस्थेत त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी तान्हाजी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक ठाकूर करीत आहे.

Protected Content