दलित चळवळीच्या कार्यकर्त्या पार्वताबाई सोनवणे यांना जलदान विधीद्वारे श्रध्दांजली

भुसावळ, प्रतिनिधी | येथील दलित चळवळीत सक्रिय असणाऱ्या व सत्याग्रहाच्या आंदोलनात पुणे येथील येरवडा जेलमध्ये एक महिन्याचा कारावास भोगलेल्या पार्वताबाई वाल्मिक सोनवणे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. आज भुसावळ येथील पंचशील नगर मध्ये फिजिकल डिस्टनन्सिग पाळत घरगुती वातावरणात त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम करण्यात आला.

भुसावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे यांच्या मातोश्री पार्वताबाई वाल्मिक सोनवणे यांचे ५ मे रोजी निधन झाले. त्यांचा दलित चळवळीत सिहाचा वाटा होता. सत्याग्रह आदोलनात त्यांना पुणे येथील येरवडा कारागृहात एक महिन्याचा कारावास झाला होता.त्यांच्या निधनाने सामाजिक पोकळी निर्माण झाली असल्याचे कार्यकर्त्यानी म्हटले आहे. लॉकडाऊनमुळे फिजिकल डिस्टनन्सिगचे पालन करीत घरगुती वातावरणात त्याचा जलदान विधी कार्यक्रम करून श्रध्दांजली वाहण्यात आली.

Protected Content