भुसावळच्या सरकारी वकिलास लाच घेतांना रंगेहात अटक

जळगाव प्रतिनिधी । भुसावळच्या एका प्रकरणातील संशयिताच्या जामीनाला विरोध दर्शविण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच स्वीकारतांना भुसावळ येथील सरकारी वकिलास Public Prosecutor एसीबीच्या नाशिक येथील पथकाने रंगेहात अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील एका प्रकरणात संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान, या संशयितांच्या जामीनाला सरकारी वकिल Public Prosecutor म्हणून आपण विरोध करू, मात्र यासाठी पाच हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी सरकारी वकिलातर्फे करण्यात आली होती. संबंधीत तक्रारदाराकडे भुसावळ न्यायालयातील सरकारी वकिल Public Prosecutor अ‍ॅड. राजेश गवई यांनी या प्रकारची लाचेची मागणी केली होती.

दरम्यान, यानंतर संबंधीत तक्रारदाराने या प्रकरणी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार नाशिक एसीबीचे पोलीस निरिक्षक उज्ज्वल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गठीत करण्यात आले. या पथकाने सापळा रचून राजेश गवई यांना जळगावातील तापी महामंडळाच्या कार्यालयाजवळ पाच हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. त्यांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content