पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात “राष्ट्रीय मतदार दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

 

आज मंगळवार दि. २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल हे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले सह महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी केले तर उपस्थित विद्यार्थ्यांना तहसिलदार कैलास चावडे व प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांना मतदानाचे महत्त्व पटवुन देतांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी भविष्यात होवु घातलेल्या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा पहिला हक्क बजावणाऱ्या युवक व युवतींना उपस्थितांच्या हस्ते मतदान कार्ड वाटप करण्यात आले. तसेच मतदार दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेतील समाविष्ट विद्यार्थ्यांचा तसेच मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग असलेल्या बी. एल. ओं.चा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला.

Protected Content