डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचा नागरी सत्कार (व्हिडिओ)

 

जळगाव,प्रतिनिधी । आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कोणतीच चिंता करू नका तसेच कोणाला घाबरू नका. काळजीला आपल्या डोक्यातून काढून टाकायला हवे असे आवाहन डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांनी अंजुमन तालिमुल मुस्लेमिन, जळगाव व जळगाव जिल्हा मणियार बिरादरीतर्फे कान्ताई सभागृहात आयोजित भव्य नागरी सत्काराला उत्तर देतांना केले. 

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात अब्दुल गफ्फार मलिक यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ग्लोबल ह्युमन पिस युनिव्हर्सिटी चेन्नई यांनी पीएच. डी. प्रदान केली आहे. यानिमित्ताने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील हे होते. विशेष प्रमुख अतिथी म्हणून महापौर सौ. भारती सोनवणे, माजी आमदार चंद्रकात सोनवणे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी उपमहापौर डॉ. करीम सालार, आ. शिरीषदादा चौधरी, अंजुमन ए ईस्लाम अध्यक्ष डॉ. जहीर काझी, अॅड. अकील ईस्माईल आदी उपस्थित होते.  मान्यवरांनी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचे कार्य समाजाला दिशा दाखविणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे सांगत गौरव केला.         

     

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/450363736417030

 

Protected Content