कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात २० बाधित रूग्ण आढळले; ६२ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २० बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ६२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज नऊ तालुक निरंक असल्याचे दिसून आले आहे. 

जिल्हानिहाय आकडेवारी

जळगाव शहर -३, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-१, चोपडा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१०, मुक्ताईनगर-२, बोदवड-० असे एकुण २० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ३४१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार २०० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५७० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज नऊ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

 

 

Protected Content