यावल तालुक्यात कोरोना विषाणूबाबत लोककला पथकाच्या माध्यमातून जनजागृती

 

यावल, प्रतिनिधी ।  प्रादेशिक लोक कला ब्युरो पुणे व महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहीती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या माध्यमातुन जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणु संसर्गाविषयी लोककला पथकाच्या वतीने नागरीकांमध्ये जनजागृती महाअभीयान राबविले जात आहे. यानुसार यावल तालुक्यात देखील लोककला पथकाद्वारे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. 

जगासह संपुर्ण देशात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीच्या संकटाशी लढा देण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळीवर कोरोना संसर्गाविषयी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. दरम्यान भारत सरकार गीत आणि नाट्य विभाग संलग्न समता कला पथक बिडच्या वतीने आज यावल शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोर, बुरूज चौकमध्ये कोरोना विषाणु संसर्गा विषयी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या कोरोनाविषयी जनजागृती मोहिमेस नागरीकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कला पथकाच्या माध्यमातुन जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, यावल , चोपडा, अमळनेर या ठीकाणी या पथकाच्या माध्यमातुन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. यात ममता कला पथक बीडच्या शाहीर मीना कांडेकर, आनंद डोळस,  युवराज डोळस, अरूण कांबळे , सुशिला पाखे, गीरीष लटींगे , ज्ञानेश्वर शिंदे यांचा सहभाग आहे .

Protected Content