Home प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय अतिदुर्गम क्षेत्रातील गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट: आदिवासींच्या जाणून घेतल्या समस्या !

अतिदुर्गम क्षेत्रातील गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट: आदिवासींच्या जाणून घेतल्या समस्या !

0
3


यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेल्या अतिदुर्गम भागातील गाडऱ्या, जामन्या,उसमळीआणि लंगडा आंबा या आदिवासी गावांमध्ये जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पर्यावरण दिना निमित्त आणि गावाच्या विकास कामाबाबत मुक्कामी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडवण्याची ग्वाही दिली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दिनांक ४ जून २०२६ रोजी संध्याकाळी साडे आठ वाजता जामन्या येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या प्रांगणात गाडऱ्या,जामण्या, उसमळी आणि लंगडाआंबा येथील ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आलीग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आली. आरोग्य विभाग_ जामन्या येथील आरोग्य उपकेंद्र , रस्त्याचा प्रश्न- पाल ते माथन आणि वाघझिरा ते लंगडांआंबा रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण होतो. दळणवळणासाठी एखादी मिनी बस चालू करावे. शेत शिवार रस्ते पानंद मध्ये घेऊन काम पूर्ण करावे,CFR जो मंजूर झालेला आहे त्यानुसार मृद व जलसंधारण तसेच इतर कामे करण्यात यावे,नरेगा मधून रोजगार प्राप्त करून द्यावा, डिंक, चारोळी, बांबू अशा उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे,बांबू लागवड आणि त्याच्यातून उत्पन्न यासाठी चंद्रपूर येथे अभ्यास दौरा आयोजित करणे.,शेल्फ वर जी कामे आहेत ते ग्रामसेवक आणि फॉरेस्ट यांच्या माध्यमातून पूर्ण करणे, गावासाठी सिंचन साहित्य, कृषी योजना, एन बी स्कीम, शबरी मधून स्पाइस क्लस्टर, घरकुल उपलब्ध करून देणे, घरकुलाचे एकूण ४४ फक्त सातच प्रस्ताव मंजूर झालेले आहेत उरलेले प्रस्ताव प्रलंबित आधार सीडींग मुळे पूर्ण झालेली नाही याबाबत चर्चा करण्यात आली.

यासोबत गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र उपलब्ध करून द्यावे व कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्धवट साहित्य वाटप झालेले आहे ते पूर्ण मिळणे अशी मागणी करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संपूर्ण गाव सोलर युक्त करणे, चारी गावांसाठी मिळून आपले सरकार सेवा केंद्र देणे, रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणे, आरोग्य उपकेंद्राला योग्य त्या सूचना केल्या, दिनांक ४ जून रोजी संध्याकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी महोदय यांनी आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन पाहणी करण्यात आली आणि संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.

दिनांक पाच जून रोजी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत यावल वनविभाग परीक्षेतील लंगडा आंबा येथील फॉरेस्ट प्लांटेशन आणि वन विभागामार्फत करण्यात आलेली कामे पाहण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त लंगडाआंबा रेस्ट हाऊस परिसरात सिताफळाची रोपे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला,सकाळी नऊ वाजता जामण्या येथील स्वस्त धान्य रेशन दुकानात भेट देण्यात आली आणि तेथील तपासणी करण्यात आली आणि योग्य ते निर्देश देण्यात आले.

सकाळी साडेनऊ वाजता आश्रम शाळा जामन्या येथे भेट देण्यात आली आणि संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आले ,सकाळी पावणेदहा वाजता जिल्हा परिषद शाळा पाझर तलाव येथे भेट देण्यात आले आणि संबंधित शिक्षकांचा गुणगौरव करून तेथील इमारतीचे बांधकाम आणि डागडुजी करण्यासाठी आश्वस्त करण्यात आले. जिल्हाधिकारी महोदय यांनी दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व कामांचा पुनःश्च आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा एक ते दीड महिन्याने या परिसरात भेट देण्याचे आश्वस्त केले.


Protected Content

Play sound