हिंगोणेसिम येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात

sant 1@

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणेसिम येथे सालाबादप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळयानिमित्त अखंड हरिनाम किर्तनसप्ताहाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या सप्ताह दरम्यान श्रीसंत बाळूमामा यांचे भागवत भक्त गुरूवर्य सदगुरू मनोहर मामा यांनी विषेश उपस्थिती दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, या ठिकाणी परिसरातील मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी आल्याने याठिकाणी भक्तांची मांडियाळी एकत्र येऊन भक्तांचा जणू मळाच फुलला होता. गुरूवर्य सदगुरू मनोहर मामा यांच्या आगमनांची भाविकांनी मोठी आतुरतेने वाट पाहत होते. गावात आल्यावर त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. त्यांची कार्यक्रमस्थळी पादयपुजन करण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या घोडागाडीच्या रथात बसवून त्यांची संपूर्ण गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्या रथाचे सारथ्य युवानेते किशोर पाटील ढोमणेकर यांनी केले.

यावेळी मिरवणुकीत बाळूमामाच्या नावाने चांग भल ! मनोहर मामाच्या नावाने चांग भल !  असा जयघोष करत भंडारा उधळण्यात आला. यावेळी गावातील भावाकांसोबत किशोर पाटील ढोमणेकर व ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली यांच्यासह भाविक बंधू भगिनींनी ठेका घेत भंडाऱ्याची उधळन करत संत बाळूमामा यांच्या नावाचा जयघोष केला. यानंतर गुरूवर्य मनोहर मामा यांनी उपस्थितीत भाविकांना तसेच गावातील तरुण पिढीला आवाहन केले की, आपण आई-वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे, वाईटसवयी व व्यसनापासून दूर राहून जीवण्यात चांगल्या गोष्टीचा मनात ध्यास घेतला पाहिजे. व प्रत्येक व्यक्तीने आधी स्वतःत सुधारणा करावी, गावात सुधारणा करत धार्मिक कार्यक्रम आयोजित करून गाव सुधारणा झाली की आपोआप परिसर सुधारणा झाली. संपूर्ण देशात आपोआपच सुधारणा होईल, असा आशावाद व्यक्त केला.

येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहा दरम्यान गावात दररोज रात्री महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. या सोहळाचे आयोजन येथील श्री संत सावता माळी बहुउदेशीय संस्था हिंगोणेसिम येथील सार्वे रोडवर असलेल्या माऊली फार्म हॉऊस आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली यांनी केले. तर सामरोप जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनीकेले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थ मंडळाने परिश्रम घेतले.

Protected Content