शिवसह्याद्री महानाट्य ; तालीमीच्या पहिल्या दिवशी प्रात्यक्षिकांची तयारी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 02 at 3.24.21 PM

चाळीसगाव प्रतिनिधी । युवानेते मंगेश दादा चव्हाण मित्रपरिवार व चाळीसगावातील समस्त सामाजिक संस्था यांच्यामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या शिवसह्याद्री या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या महानाट्यामध्ये सहभागी असलेल्या कलाकारांनी पहिल्या दिवसाच्या तालीममध्ये चांगलाच रंग भरला.

येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी शिवसह्याद्री महानाट्याचे भव्य असा प्रयोग चाळीसगाव शहरातील सिताराम पैलवान यांच्या मैदानावर होणार आहे. या महानाट्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील स्थानिक कलाकारांना मोठ्या प्रमाणावर काम करून कलागुण दाखवण्याची संधी मिळत आहे. इच्छुक हौशी कलावंतांचे दिनांक १ ऑगस्‍ट रोजी येथील पाटीदार भवन कार्यालयात प्राथमिक चाचणी (ऑडीशन) घेण्यात आली. यात यावेळी महाविद्यालयीन व शाळकरी तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. आज २ ऑगस्ट रोजी शिवसह्याद्री या भव्य महानाट्याच्या तालीमीचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी महानाट्य प्रयोगावेळी लेखक व दिग्दर्शक अॅड  . विनय दाभाडे यांनी उत्तमरित्या प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखविले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून कसरती करून घेतल्या. यशस्वीतेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप घोरपडे, भूषण पाटील, सुनील निकम सर, सिद्धांत पाटील, भरत पाटील, मयूर पाटील, प्रणव वाघ, गणेश पाटील, रोहित कोतकर आदींनी कामकाज पहिले.

 

Protected Content