कासोद्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचा भारतीय लष्करात प्रवेश

कासोदा, प्रतिनिधी । मागील महिन्यात १० जानेवारी रोजी परभणी येथील लष्कर भरतीत मैदानी चाचणीत पास होऊन दि. २३ फेब्रुवारी रोजी पेपर घेण्यात आला होता. त्यांचा दि. ४ मार्च रोजी निकाल लागला असून यात कासोद्यातील शेतकऱ्यांच्या चारही मुलांनी उत्तीर्ण होऊन भारतीय सैन्य दलात आपली जागा तयार केली आहे.

 

पंच प्राणेश्वर मंदिरात साधना हायस्कूलचे प्रा. सी.जी. पाटील यांनी २ वर्षांपासून अभ्यासिका उघडून कासोद्यातील ३० ते ४० विद्यार्थांना मोफत मार्गदर्शन करून शिक्षण देते होते. हे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून कुठेही ऑकेडमित न जाता पंच प्राणेश्वर अभ्यासिकेत यश संपादन करून लष्करात भरती झालेत.  तर एक विद्यार्थी नागपूर कोर्टात शिपाई या पदावर कार्यरत आहे. मा. प्रा.सी.जी. पाटील व लष्करात भरती झालेल्या चारही विध्यार्थी निलेश अमर पाटील , कपिल युवराज पाटील , चेतन नाना पाटील, अतुल सुरेशसिंग परदेशी यांचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.  भारत मातेच्या रक्षणाची धुरा सांभाळण्यासाठी , पोलीस आर्मी , एमपीएससी ,यूपीएससीसाठी कासोद्यातून अजून १५० ते २०० मूल दररोज मैदानी व लेखी परीक्षा ची पूर्व तयारी करत असून यासर्वांना मोलाचे असे मार्गदर्शन मा. प्रा. सी.जी. पाटील व पालक , गावातील सुज्ञ नागरिक करीत आहे. पंचप्रानेश्वर अभ्यासिके भाहेर सर्व विध्यार्थ्यांनी पेढे वाटप करत फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले.

Protected Content