जळगाव जिल्ह्यात आज तेवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 22 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तेवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दरम्यान, यातील तीन रूग्ण हे आधीच पॉझिटीव्ह असून त्यांचा आजचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे.

 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, जळगावचे अकरा, चोपडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये एक रुग्ण पळासखेडे, ता. जामनेर येथील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 320 इतकी झाली आहे. दरम्यान, धरणगावातील नवे गाव परिसरातील कोरोना बाधीत आढळून आलेल्या महिलेच्या संपर्कातील क्वॉरंटाईन केलेल्या १७ जणांपैकी ७ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह तर १० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान, आता शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९ वर पोहचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ९४ कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल दरम्यान, १८ मे रोजी प्राप्त झालेल्यापैकी ७६ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर १८ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान, यातील तीन रूग्ण हे आधीच पॉझिटीव्ह असून त्यांचा आजचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे. परिणामी आज जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ३१७ इतकी असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने ताज्या अपडेटमध्ये दिली आहे.

Protected Content