जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे महाविद्यालयात आज राजभाषा दिन ऑनलाईन या पध्दतीत साजरा करण्यात आला.
म्हसावद ता.जळगाव येथील स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून २७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात ऑनलाइन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रा. नितीन सदाशिव पाटील (प्रताप महाविद्यालय अमळनेर)हे प्रमुख व्याख्याते म्हणून ऑनलाइन उपस्थित होते,यांनी आपल्या बोलण्यातून प्रथमतःश्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांना वंदन करून माय मराठीचा गौरव करतांना पुज्य साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’या सुसंस्कारित मुल्यांची जोपासणा करणाऱ्या पुस्तकाचा उल्लेख केला,आपल्या अंगवळणी पडलेल्या मराठी भाषेचा प्रचार,प्रसारासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करायला हवेत असे आवाहन सरांनी केले. वाचाल तर वाचाल हा विचार मांडताना सर्व भाषांचे अस्तित्व आपण मान्य करून जीवनात यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या.
सदर विचार पर्वणीमध्ये जी.डी.बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्राचार्य पी.डी.पाटील, शिरीष सोनार, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्यू.कॉलेजच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मेहनत घेतली.