कोरोना: जळगावात पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी।  कोव्हीड रुग्णालयात कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले. यात शहरातील एक पोलिस कर्मचारी कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहीती अशी की, दक्षता नगर पोलीस लाईनमध्ये वास्तव्याला असलेला तथा पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका विभागात काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला कोरोनाचे लक्षण जाणवल्याने त्याला कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला असुन तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळुन आले आहे. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेल्या नातेवाईक आणि इमारतीच्या इतर कुटुंबालाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

Protected Content