राष्ट्रीय संघर्ष समितीचे एक दिवसीय धरणे आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय राष्ट्रीय संघर्ष समिती अर्थात ईपीएसच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेन्शनधारकांचा क्रांती दिनानिमित्त बुधवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले

 

याबाबत दिलेली माहिती अशी की, नवी दिल्ली येथे ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत आणि त्यांच्यासोबत काही वृद्ध पेन्शनधारक आणि महिला यांना धक्काबुक्की करत अमानवीय वर्तणूक केल्याची घटना घडली होती. पेन्शन धारकांचे विविध मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याचे दिसून आले. या घटनेबाबत पेन्शनधारकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. याचा तीव्र निषेध म्हणून अखिल भारतीय राष्ट्रीय संघर्ष समिती अर्थात ईपीएस संघटनेच्या वतीने बुधवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजीव खडसे, सचिव डी एन पाटील, प्रसिद्धीप्रमुख कौतिक तिरंगे, समन्वयक अनिल पवार, एम एम सरोदे, पी एस पाटील, दिलीप किरंगे, अनिल जावळे, सुरेश महाजन, डी बी वानखेडे, संतोष पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content