मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून अखेर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण देतांना तो व्हिडीओ जुना असून आपण तेव्हाच माफी मागितली असल्याचे सांगितले.
कालच केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचादेखील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरून दानवे यांच्यावर जोरदार टीका देखील केली जात होती. दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.ते म्हणाले की, सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.
या प्रकरणी अखेर रावसाहेब दानवे यांनी माफी मागितली आहे. अलीकडेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजापाच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधानं केली आहेत. यातच हा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली होती.