यावल तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर जि. प. सदस्य सोनवणे यांची अध्यक्षपदी निवड

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनुसार यावल तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीवर जि. प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

विकासावर भर देण्याच्या दृष्टीने शासनाने सामाजिक व आर्थिक विकासाचे अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत या कार्यक्रमाचे यश हे सर्वस्वी ते कशा पद्धतीने कार्यान्वित केले जातात आणि या कार्यक्रमाची संलग्न असलेले स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक पुढाकार यांच्यावर अवलंबून असते हे लक्षात घेऊन शासनाने तालुका पातळीवर संदर्भीय निर्णयानुसार एकात्मिक विकासासाठी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार यावल तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. या समितीवर जि. प .सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर अशासकीय सदस्यपदी लीलाधर विश्वनाथ चौधरी(भालोद), नितीन व्यंकट चौधरी (अट्रावल ), मुकेश पोपटराव येवले (यावल), रविंद्र पोलाद सोनवणे (वढोदा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इतर अशासकीय महिला सदस्यपदी जयश्री विकास पाटील (सांगवी खुर्द), ललिता विलास चौधरी (फैजपूर), प्रेरणायुवराज भंगाळे (सांगवी) यांची निवड करण्यात आली आहे
यावल तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर अध्यक्षपदी प्रभाकर अप्पा सोनवणे व अशासकीय सदस्य म्हणुन प्रा . मुकेश पोपटराव येवले व ईतरांची निवड झाल्याबद्दल त्यांचे आमदार शिरीष चौधरी , आमदार लताताई सोनवणे , राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अॅड. रविन्द भैय्या पाटील , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, राष्ट्रवादीचे विजय प्रेमचंद पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, सेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी , काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, हाजी शब्बीर खान, राष्ट्रवादीचे वसंत पाटील, नाना बोदडे, अय्युब खान सर , अरूण लोखंडे यांच्या सह महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.

Protected Content