राज्यात परिक्षांमध्ये कॉपी किंवा अन्य गैरप्रकार केल्यास १० वर्षाची कैद व एक कोटीपर्यंतच्या दंडाची शिक्षा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या परीक्षांमध्ये पेपरफुटी, कॉपी किंवा अन्य मार्गाने गैरप्रकार करणाऱ्यांना १० वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटीपर्यंतच्या दंडाची तरतूद असलेल्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून याबाबतचे विधेयक याच अधिवेशनात संमत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नीट-यूजी परीक्षेतील घोटाळ्यानंतर स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकारला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच कायदा केला आहे. राज्यात यापूर्वीच फेब्रुवारी १९९६मध्ये महाराष्ट्र विद्यापीठांच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियमात (१९९२) सुधारणा करून हा कायदा राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आला आहे. मात्र १९८२च्या कायद्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या गैरप्रकारांबाबत तपशीलवार तरतुदी नाहीत. तसेच हा कायदा केवळ राज्य परीक्षा मंडळ आणि विद्यापीठांच्या परीक्षेसाठी लागू असल्याने त्यातील शिक्षेच्या तरतुदी कमी आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी कठोर शिक्षेच्या तरतुदी असलेला नवा कायदा करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Protected Content