बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरियाणातील सोनीपत येथे राष्ट्रीय अकादमी मध्ये झालेल्या तिरंदाजी संघाच्या निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याने बुलढाण्याचा प्रथमेश जवकार याची भारतीय तिरंदाजी संघात निवड झाली आहे.
दरम्यान त्याची कामगिरी पाहता आगामी वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या चार क्रीडा स्पर्धेत खेळण्याची त्याला संधी आहे. गेल्या ६ वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथमेश चमकला होता. त्यात २ दोन सुवर्ण व १ रजत पदकाची कमाई केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याला खेळण्याची काही संधी मिळाल्या होत्या. दरम्यान १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान हरियाणातील सोनीपत येथे तिरंदाजीच्या राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणी त्याने केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता. त्याची भारतीय तिरंगाजी संघाची निवड झाली आहे. परिणामी आगामी वर्षात होणाऱ्या वर्ल्ड कप, एशियन गेम्स वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन चॅम्पियनमध्ये त्यामुळे घेणे संधी मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतासाठी पुन्हा दमदार कामगिरी करून पदक मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न राहते. दुसरीकडे १ मार्च हरियाणातील सोनीपत येथील साईच्या शिबिरामध्ये भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षण सुरू होणार आहे .त्यात तो सहभागी होणार आहे. त्याला प्रशिक्षण चंद्रकांत इलग यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बुलढाणा आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लहाने ,सचिव मनोहर व्यवहारे, शिवबा आरचरी अकादमीचे अध्यक्ष ॲड. सुधाकर दळवी महाराष्ट्र धनुरविद्या संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, भारतीय तिरंदाजी संघाचे सचिव प्रमुख चांदुरकर यांनी त्याच्या अभिनंदन करून त्याच्याकडून चांगला खेळाची अपेक्षा व्यक्त केली आहे.