बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जन्म आणि मृत्यू हे विधिलिखित असते अस पण वाचत ऐकत असतो. त्याचा प्रत्यय आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात आला.
एका गरोदर महिलेला मेहकर तालुक्यातून थेट बुलढाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्रसूती वेदना सुरू झाल्याने रुग्णवाहिकेचे रूपांतर रुग्णालयात होऊन त्या गरोदर महिलेने रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि रुग्ण वाहिका चालकाच्या तत्परतेने एक गोंडस बाळाला जन्म दिला.
पण नेहमी सरकारी यंत्रणा आणि त्यातच वैद्यकीय क्षेत्रातील सरकारी दवाखान्यांना बाबत बोट मोडत असतो तिथल्या आरोग्य सेवेचे लफ्तरे निघाल्याच्याच घटना किंवा चित्र समोर येत असते .पण आज बुलढाणा जिल्ह्यात नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
हो बुलढाणाला जाताना वाटेतच रूग्णवाहिकेत प्रसूती..!
मेहकर तालुक्यातील मोळी येथील स्वाती वानखेडे नामक महिलेला मेहकर येथील ग्रामिण रुग्णालयात सकाळी प्रसूतीसाठी भरती करण्यात आले. त्यांच्या रक्ताची चाचणीत 4.6 इतके कमी रक्त असल्या कारणाने बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.त्यानुसार रुग्णाला 108 गाडी क्रंमाक एम एच 14 सी एल 1308 ने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जात असतांना वाटेतच साखळी फाट्याजवळ सदर महिलेचे पोट दुखद असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पिसे यांनी आपतकालीन सहकारी पायलट संदीप पागोरे यांच्या सहकार्याने अतिशय बिकट परिस्थितीत साधारण प्रस्तुती पार पाडावी लागली. आईची व मुलाची प्रकृती अतिशय ठणठणीत असुन त्यांना जिल्ह्या रुग्णालयात भरती केले आहे. येथील आरोग्य अधिकारी यांनी डॉक्टर व पायलट यांचे 108 गाडी वरील कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.