आदर्श शिक्षकांकडून यशवंत विद्यार्थिनीचा सत्कार

 

पारोळा, प्रतिनिधी ।  तालुक्यातील धुळपिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थिनी चिन्मयी दिलीप ठाकरे हिने आँनलाईन अभिव्यक्ती स्पर्धेत द्वितीय गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल निवृत्त शिक्षक स. ध. भावसार यांनी सत्कार करून कौतुक केले. 

जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे ऑनलाईन अभिव्यक्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत धुळपिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील ५ विची विद्यार्थिनी चिन्मयी ठाकरे हिने द्वितीय गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिचं हे नेत्रदीपक यश तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याने  येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक स. ध. भावसार यांनी तिला आपल्या निवासस्थानी बोलावून शाल, पुष्पगुच्छ, गौरव पत्र, रोख बक्षीस व अभिनंदन पत्र देऊन भावपूर्ण सत्कार केला आणि पुढील वाटचाल व उज्वल भविष्यासाठी अनेकोत्तम शुभ आशीर्वाद दिलेत.

Protected Content