तळवेलचे तबलावादक आशिष राणेंचा केला होता ऋषि कपूर यांनी गौरव !

जळगाव तुषार वाघुळदे । ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील प्रसिध्द तबला वादक आशिष राणे यांचा पवई येथील कार्यक्रमात सत्कार केला होता. आज ऋषी कपूर यांच्या मृत्यूमुळे राणे यांनी या आठवणीला उजाळा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, पवई येथील कस्टम ऑफीसर कॉलनीत तीन वर्षापूर्वी म्युझिकल इव्हेंट झाला होता , त्यावेळेस अप्रतिम तबलावादन केल्याबद्दल चित्रपट सृष्टीसाठी भरीव योगदान देणार्‍या घराण्याचा वारसा असणारे हॉलिवूड कलावंत ऋषिकपूर यांनी भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील प्रसिद्ध तबलावादक आशिष राणे यांचा विशेष सत्कार केला होता.

..त्यानंतर अरबाज खान व ऋषिकपूर या दोघांनी एकत्रितरित्या एक गाणंही गायिले होते ..ऋषिकपूर यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. यावेळी अभिनेता अनिल कपूर, रजा मुराद , मनोज जोशी यांची विशेष उपस्थिती होती हे विशेष …!! याबाबत सांगतांना आशिष राणे म्हणाले की, त्यावेळची ती आठवण कधीही न विसरणारी अशीच आहे , एक वेगळी ऊर्जा मिळाल्याचे मला समाधान राहील. आज हा चॉकलेट हिरो काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख आहे , अशा शब्दात कलावंत आशिष राणे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज शी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, त्यावेळी माझ्यासोबत प्रसिद्ध गायक गंधार जाधवही होता. रॉक ( सुफी ) बँड आणि ऋषिकपूर , अनिलकपूर या जोडीने धम्माल केली होती..अशी आठवण श्री.राणे यांनी सांगितली. श्री.राणे यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांनी मार्गदर्शन केले असून पं. रामदास पळसुले , पं. जयंत नाईक यांच्याकडे तबलावादनाचे धडे गिरवले आहेत. तळवेलसारख्या छोट्याशा गावातील आशिष राणे यांचे दिग्गज कलावंतांकडून कौतुक झाले , ही एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे .

वख्यात अभिनेता ऋषिकपूर जरी जळगांवला आलेला नसला तरी १९८५ – ८६ च्या सुमारास सुप्रसिद्ध अजिंठा लेणी पहावयास गेला होता अशी माहिती आहे. जळगावला त्यांचे वडील राजकपूर व भाऊ राजीव कपूर अनुक्रमे नेहरू चौकातील पाणपोई व नवीन फुले मार्केटच्या उदघाटनासाठी येऊन गेले. त्यांची जी.एस. ग्राउंडवर सभा झाली होती .मात्र ऋषिकपूर जळगावला आलेले नव्हते.

Protected Content