जळगावकर स्मीतल ढाके यांना ब्रिटनमधील प्रतिष्ठेचा पुरस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | मूळच्या जळगावकर आणि सध्या ब्रिटनमधील डेटा सायंटीस्ट म्हणून कार्यरत असणार्‍या स्मीतल ढाके यांना अतिशय प्रतिष्ठेचा असा युके रेल अवॉर्डने नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेकांनी विदेशात आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली आहे. यात आता स्मीतल ढाके ( वय २६ वर्षे ) यांची भर पडली आहे. २६ वर्षांच्या स्मीतल ढाके या मूळच्या जळगावकर असून सध्या ब्रिटनमध्ये डेटा सायंटीस्ट म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जळगावात झाले. तर नाशिक येथून त्यांनी अभियांत्रीकीत पदवी संपादन केली. यानंतर लंडनमधील किंग्ज कॉलेमधून त्यांनी पदवी संपादन केली. त्या युके आणि आयर्लंडमधील ख्यातनाम कंपनी अलस्टॉम येथे डेटा सायंटीस्ट म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी ब्रिटन आणि हॉलंडमधील रेल्वे कंपन्यांना आपली सेवा प्रदान करते. यात स्मीतल या पहिल्या आणि एकमेव डेटा सायंटीस्ट आहेत.

बर्मींघम येथे अलीकडेच पार पडलेल्या शानदार कार्यक्रमात स्मीतल ढाके यांना न्यूकमर ऑफ द इटर या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणार्‍या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात एआय आणि मशीन लर्नींगच्या मदतीने रेल्वे प्रणालीत अचूकता आणण्यासाठी स्मीतल यांनी प्रयत्न केले. यामध्ये साधारणपणे तीन वर्षे लागणारे काम त्यांनी सहा महिन्यात पूर्ण करून दाखविले आहे. याचा विशेष करून रेल्वे वाहतुकीत लाभ होत आहे. याचीच पावती त्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली आहे.

दरम्यान, स्मीतल ढाके यांनी हा पुरस्कार स्वीकारतांना मनोगत व्यक्त करतांना यामुळे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळेल असे सांगितले. आपल्याला आजवरच्या वाटचालीत अनेक जणांनी सहकार्य केले असून या सर्वांचे त्यांनी आभार मानले. विशेष करून आपल्याला आजी-आजोबांपासून प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

स्मीतल ढाके यांना मिळालेला पुरस्कार हा अतिशय गौरवास्पद असून याची ब्रिटनसह भारतीय प्रसारमाध्यमांनी दळल घेत त्यांचे कौतुक केले आहे. तर जळगाव जिल्ह्यासाठी देखील ही अतिशय अभिमानाची बाब मानली जात आहे.

Protected Content